Ad will apear here
Next
पुण्यात १३ जुलैला ‘नवा शुक्रतारा’
पुणे : संगीतातील अढळ शुक्रतारा अरुण दाते यांना सांगीतिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अरुण दाते कला अकादमी आणि मॅजेस्टिक लॅंडमार्क्स यांच्यातर्फे ‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. १३ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर प्रशालेच्या एमईएस सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

यात प्रसिद्ध गायक व संगीतकार मंदार आपटे, गायक श्रीरंग भावे, गायिका प्रज्ञा देशपांडे यांचा सहभाग असून, सिने अभिनेत्री अनुश्री फडणीस या निवेदन करणार आहेत. याबरोबरच अरुण दाते यांचे सुपुत्र व कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची आहे ते अतुल दाते स्वत: आपल्या वडिलांच्या कारकीर्दीतील रसिकांनी सहसा न ऐकलेल्या आठवणींचा खजिना उपस्थितांसमोर उलगडून दाखवतील. दृकश्राव्य माध्यमातून (ऑडिओ व्हिज्युअल) स्वत: अरुण दाते यांचा असणारा सहभाग हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.

मंदार आपटे हे ‘राधा ही बावरी’ या मालिकेबरोबरच ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाचे संगीतकार आणि गायक आहेत. श्रीरंग भावे हे ‘बालगंधर्व’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटांचे गायक आहेत. प्रज्ञा देशपांडे यांनी अरुण दाते यांबरोबर सर्वाधिक म्हणजे तब्बल ७०० कार्यक्रमांमध्ये गायन केले असून, अरुण दातेंबरोबर इतके कार्यक्रम करणाऱ्या त्या एकमेव गायिका आहेत. याबरोबरच कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्या अनुश्री फडणीस या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘दशक्रिया’ चित्रपटातील अभिनेत्री आहेत.

अरुण दाते यांनी वयोमानापरत्वे ‘शुक्रतारा’ कार्यक्रम करणे थांबवले, तेव्हा त्यांनी त्यांचे सुपुत्र अतुल दाते आणि मंदार आपटे, श्रीरंग भावे यांना हा ‘नवा शुक्रतारा’ कार्यक्रम करण्याची परवानगी दिली होती. हा कार्यक्रम विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाईल.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
शुक्रवार, १३ जुलै २०१८
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : एमईएस सभागृह, बालशिक्षण मंदिर प्रशाला, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZWNBQ
Similar Posts
‘हात तुझा हातातून’मधून भेटीला येणार अरुण दातेंच्या आठवणी पुणे : भावसंगीताच्या क्षितिजावरील अढळ शुक्रतारा म्हणून ओळख असलेल्या अरुण दाते यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त अरुण दाते कला अकादमी आणि रोहन पाटे यांच्या वतीने पुण्यात ‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, अरुण दाते यांचे पुत्र अतुल यांनी वडिलांच्या आठवणींवर लिहिलेल्या ‘हात तुझा
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..! पुणे : ‘आपलं आयुष्य फार सुंदर आहे. ते पूर्ण जगणं आवश्यक आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपली साथ एकच गोष्ट देते ते म्हणजे आपले शरीर. म्हणून शरीर सुदृढ तर जगणं सुंदर. म्हणूनच निरोगी जगा आणि अरुण दाते म्हणतात तसे ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करा,’ असे मत ऑरेंज डायबेटीस फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका डॉ
पुणेकरांनी अनुभवल्या अरुण दातेंच्या सुरेल आठवणी पुणे : गाण्याचा कार्यक्रम करून मध्यरात्री घरी परतत असताना अरुण दाते यांची गाडी एका पोलीस अधिकाऱ्याने थांबविली. दातेंना वाटले आता पोलीस गाडी तपासणार, कागदपत्रांची छाननी करणार पण झाले उलटेच. पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्यासमोर वही व पेन धरत म्हटले मला तुमची सही हवीय... दातेंनी सही केली, मात्र आश्चर्याने
अरुण दाते यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम पुणे : ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त माणिक एंटरटेनमेंट निर्मित आणि अतुल दाते प्रस्तुत ‘हात तुझा हातातून’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी, चार मे रोजी सायंकाळी पाच वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तीन पिढ्यांची गायकी एकत्र अनुभवायला मिळणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language